{"product_id":"bruha-gitashastra-khand-2","title":"Bruhat Gitashastra - Khand 2 | बृहत गीताशास्त्र - खंड २","description":"\u003cp\u003eश्रीमद्भगवद्गीतेवरील द्वि-खंडांत्मक भाष्याचा हा दुसरा खंड. प्रस्तुत खंडात आठवा अध्याय अक्षरब्रह्मयोग पासून अठरावा अध्याय मोक्षसंन्यासयोग पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धान्त, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त, दृष्टान्तकथा, कौटुंबिक-सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्त्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे. गीता अभ्यासकांना निरूपणासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनाही ग्रंथ-विषय सहज समजतील, प्रेरणादायी ठरतील; असा विश्वास वाटतो. सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान म्हणून भगवद्गीतेला जगात सर्वदूर मान्यता आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअनेक देशी-विदेशी विचारवंतांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर आपलं जीवन घडवलं आहे. गीताविचार समजून घेऊन त्यानुसार कृती केली तर व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक प्रश्न सहज दूर होऊ शकतील आणि खऱ्या अर्थाने मानवतेची प्रस्थापना होऊ शकेल. या दृष्टीने प्रस्तुत भाष्य नव्या पिढीसाठी पथदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. लेखकाविषयी माहिती : राजेन्द्र खेर साहित्यिक, अभ्यासक आणि निरूपणकर्ते आहेत. प्राचीन भारतीय शास्त्रांचे अभ्यासक. त्यांचे गीताशास्त्र, दैनंदिन भगवद् गीता, बृहत् गीताशास्त्र हे ग्रंथ प्रकाशित.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअध्यात्म, श्रीमद् भगवद्गीता, महाभारत, यांतील विविध विषयांवर जवळपास ५०० व्याख्याने. ऐतिहासिक-पौराणिक-चरित्र कादंबऱ्यांचे लेखक. चित्रपट क्षेत्रात त्यांनी नऊ वर्षे लेखन-दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध क्षेत्रांत काम. ‘मायबोली’ वाहिनीवर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आजवर १५ पुस्तके प्रकाशित. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555791443,"sku":null,"price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Bruhat_Geeta_Part_2_Cover_Front.jpg?v=1774240195","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bruha-gitashastra-khand-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}