{"product_id":"bruhat-gitashastra-khand-1-2-by-rajendra-kher-marathi","title":"Bruhat Gitashastra Khand 1 \u0026 2 | बृहत गीतशास्त्र खंड 1 व 2 by राजेंद्र खेर | Rajendra Kher","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eश्रीमद्भगवद्गीतेवरील द्वि-खंडांत्मक भाष्याचा हा पहिला खंड. प्रस्तुत खंडात पहिला अध्याय 'अर्जुनविषादयोग 'पासून सातवा अध्याय 'ज्ञानविज्ञानयोग 'पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धान्त, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त, दृष्टान्तकथा, कौटुंबिक सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्त्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे. गीता अभ्यासकांना निरूपणासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनाही ग्रंथ-विषय सहज समजतील, प्रेरणादायी ठरतील; असा विश्वास वाटतो.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रीमद्भगवद्गीतेवरील द्वि-खंडांत्मक भाष्याचा हा दुसरा खंड. प्रस्तुत खंडात आठवा अध्याय 'अक्षरब्रह्मयोग' पासून अठरावा अध्याय 'मोक्षसंन्यासयोग' पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धान्त, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त, दृष्टान्तकथा, कौटुंबिक-सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्त्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगीता अभ्यासकांना निरूपणासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनाही ग्रंथ-विषय सहज समजतील, प्रेरणादायी ठरतील; असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान म्हणून भगवद्गीतेला जगात सर्वदूर मान्यता आहे. अनेक देशी-विदेशी विचारवंतांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर आपलं जीवन घडवलं आहे. गीताविचार समजून घेऊन त्यानुसार कृती केली तर व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक प्रश्न सहज दूर होऊ शकतील आणि खऱ्या अर्थाने मानवतेची प्रस्थापना होऊ शकेल. या दृष्टीने प्रस्तुत भाष्य नव्या पिढीसाठी पथदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45720374640723,"sku":null,"price":1700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/813WD_Y62gL._SL1500.jpg?v=1781881551","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/bruhat-gitashastra-khand-1-2-by-rajendra-kher-marathi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}