Skip to product information
Tyagmurti Mata Ramai | Budha Charitra | त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर | बुद्ध चरित्र | by Dharmanand Kosambi avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Language: Marathi

त्या मातेनं तरी किती दुःख सोसायचं. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रंदिवस प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शेणाचा भार डोक्यावर वाहायला तिला कमीपणा वाटला नाही. दारोदार शेणाच्या गोवर्‍या विकायलाही ती लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वत: वाट्टेल तेवढे कष्ट उपसत राहिली. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दुष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो. त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं?

जो त्याला मनापासून मान देतो, त्याचाच तो घास घेतो. मग देव आहे की देव नावाचं थोतांड? दुःखाअंती सुख असते, असे म्हणतात; पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात; पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा, आर्थिक विवंचनेचा वणवा होता; तरीही ध्येयवादाची महत्त्वाकांक्षा होती. कष्टाअंती विश्रांती हवी असते; पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही पोटातील भुकेचा वणवा शमविता येत नव्हता. कच्चीबच्ची मुले भुकेने व्याकूळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखं लाडकं बाळ मरणाच्या दारी गेलं.

आई – बापाचं हृदय किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रांसारखे. गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले. बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो. आचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. आचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Tyagmurti Mata Ramai | Budha Charitra | त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर | बुद्ध चरित्र |

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like