{"product_id":"chef-special-sandwiches-शेफ-स्पेशल-सँडविचेस-by-chef-viraj-athavale-शेफ-विराज-आठवले","title":"Chef Special Sandwiches |  शेफ स्पेशल सँडविचेस By Chef Viraj Athavale |  शेफ विराज आठवले","description":"\u003cp\u003eसंपूर्ण जगाला एका धाग्यात जोडण्याचं निर्विवाद श्रेय 'ब्रेड'ला जातं. दळणवळणाच्या साधनांनी जग जवळ आलं, पण त्यातल्या भिन्न भिन्न खाद्यसंस्कृतींमुळे समरस होण्यात नक्कीच अडथळे होते. ब्रेडनं साऱ्या खाद्यसंस्कृतीच्या सीमारेषा पुसट करून टाकल्या. दोन ब्रेडच्या सापटीत मग अपरिचित चवीचा पदार्थ असला, तरीही तो सहजपणानं आपलासा केला जाऊ लागला. 'सँडविच' या नावानं ओळखला जाणारा हा पदार्थ अख्ख्या जगावर राज्य करतो आहे.\u003cbr\u003eखंड कोणताही असू देत, देश कोणताही असू देत, राज्य, शहर, गाव, किनारी प्रदेश की डोंगराळ, वाळवंट की बर्फाच्छादित, सँडविच हा चालणारा प्रकार आहे. लोकल किंवा ग्लोबल, जे उपलब्ध असेल, ते अंगीकारून सँडविच आपल्या पुढ्यात येतं, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्यच होतं.\u003cbr\u003eबदललेल्या जीवनशैलीतला सर्वाधिक भरवशाचा साथीदार असलेल्या सँडविचच्या विविध प्रकारांचा पट या पुस्तकात उलगडला गेला आहे. ग्लोकल अनुभव पदरी असलेल्या सिद्धहस्त शेफ विराज आठवले यांनी तो खास मराठी वाचकांसाठी सादर केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45813408530515,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_5_1a803b8a-162c-4d76-be01-42120d0365ad.jpg?v=1783924940","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chef-special-sandwiches-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%ab-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%81%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%b8-by-chef-viraj-athavale-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%ab-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}