आपण केलेल्या कष्टाचं, दानाचं फळ आपल्याला मिळायलाच हवं; पण मी एखादं कार्य निःस्वार्थीपणे करतो आहे, ही भुरळ स्वतःला पडू देऊ नका... ---- प्रत्येक ठिकाणी लहानपणा घ्यावा; पण प्रत्येक ठिकाणी मोठंपण घेऊनही गंमत नसते, हे समजलं तर उत्तमच. कारण, खरं मोठंपण हे दुसर्याच्या क्षम्य चुका सामावून घेण्यात असतं... --- आपली परिस्थिती आपल्याशिवाय कोणी दुसरं बदलू शकत नाही, ही गोष्ट माहीत असूनसुद्धा आपण आपल्या परिस्थितीसाठी दुसर्या कोणाला तरी दोष देतो... --- आपण जर समोरच्याला विश्वासात घेऊन आपल्या त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि का आहेत, हे जर स्पष्टपणे बोललो तर बराचसा होणारा कडवटपणा होण्यापूर्वीच नाहीसा होईल ना? नाही का? --- जे जीवन आपण जगतो, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गुरू नाही; पण ज्याने शिकायचेच सोडले आहे, त्याला तरी काय समजणार? एखाद्याने शिकायचे सोडले की, त्याचं आयुष्य हे अबोल होतं आणि अबोल आयुष्याकडून ना समोर आलेले प्रश्न समजतात, ना उत्तरं...
Pickup available at HO
Usually ready in 24 hours