{"product_id":"chhata-manavi-svabhavachya-marg-vyaktimattva-vikasacha","title":"छटा मानवी स्वभावाच्या मार्ग व्यक्तिमत्व विकासाचा | Chhata Manavi Svabhavachya Marg Vyaktimattva Vikasacha","description":"\u003cp\u003eआपण केलेल्या कष्टाचं, दानाचं फळ आपल्याला मिळायलाच हवं; पण मी एखादं कार्य निःस्वार्थीपणे करतो आहे, ही भुरळ स्वतःला पडू देऊ नका... ---- प्रत्येक ठिकाणी लहानपणा घ्यावा; पण प्रत्येक ठिकाणी मोठंपण घेऊनही गंमत नसते, हे समजलं तर उत्तमच. कारण, खरं मोठंपण हे दुसर्‍याच्या क्षम्य चुका सामावून घेण्यात असतं... --- आपली परिस्थिती आपल्याशिवाय कोणी दुसरं बदलू शकत नाही, ही गोष्ट माहीत असूनसुद्धा आपण आपल्या परिस्थितीसाठी दुसर्‍या कोणाला तरी दोष देतो... --- आपण जर समोरच्याला विश्वासात घेऊन आपल्या त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि का आहेत, हे जर स्पष्टपणे बोललो तर बराचसा होणारा कडवटपणा होण्यापूर्वीच नाहीसा होईल ना? नाही का? --- जे जीवन आपण जगतो, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गुरू नाही; पण ज्याने शिकायचेच सोडले आहे, त्याला तरी काय समजणार? एखाद्याने शिकायचे सोडले की, त्याचं आयुष्य हे अबोल होतं आणि अबोल आयुष्याकडून ना समोर आलेले प्रश्न समजतात, ना उत्तरं...\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391218771,"sku":"9.78936E+12","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Chhata_20manvi_20swabhavachya_20front.jpg?v=1795505095","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chhata-manavi-svabhavachya-marg-vyaktimattva-vikasacha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}