{"product_id":"chhodo-bharat-aandolan-nashik-jilha-vishesh-sandarbh","title":"छोडो भारत आंदोलन (नाशिक जिल्हा विशेष संदर्भ) | Chhodo Bharat Aandolan (Nashik Jilha Vishesh Sandarbh)","description":"\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील 'छोडो भारत पर्व' हे भारतीय जनतेने स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिशेने टाकलेले अंतिम व निर्णायक असे पाऊल. याअगोदर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या अनेक लहान-मोठ्या चळवळींचा आणि मवाळ, जहाल व क्रांतिकारी अशा अनेक मार्गांचा सार-समन्वय या आंदोलनातून दिसून आला. या सर्व सार समन्वयामागे स्वातंत्र्यप्राप्ती हाच एकमेव उद्देश होता. त्यासाठीच देशभरातील अनेक देशभक्तांनी दीर्घकाळ सुरू असलेल्या या संघर्षाला स्वातंत्र्यप्राप्तीद्वारे पूर्णविराम देण्याचा प्राणांतिक प्रयत्न केला; ज्याची फलश्रुती आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ठरले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या प्रयत्नांतील क्रांतिपर्व ठरलेले छोडो भारत आंदोलन नाशिक जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवर राष्ट्रीय घटनांच्या क्रिया- प्रतिक्रियांचे आकलन करून, तसेच समाजातील सर्वसामान्य समाजघटकांना केंद्रभूत मानून, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेऊन समग्र व संदर्भासह चित्रण करण्याचा प्रस्तुत ग्रंथ माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. हा ग्रंथ नाशिक जिल्ह्याच्या स्थानिक इतिहासामध्ये, विशेषतः स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये भर घालणारा असल्यामुळे इतिहास अभ्यासक, संशोधक व सुज्ञ वाचक या ग्रंथाचे निश्चितच स्वागत करतील, अशी आशा आहे. - डॉ. संतोष दत्तात्रय बोडके\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281353502803,"sku":"9.78939E+12","price":338.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/chodo_20bharat_20andolan_20front.jpg?v=1795504713","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chhodo-bharat-aandolan-nashik-jilha-vishesh-sandarbh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}