{"product_id":"chitrabandh-चित्रबंध-by-amol-ukidve-अमोल-उकिडवे","title":"Chitrabandh | चित्रबंध By Amol Ukidve | अमोल उकिडवे","description":"\u003cp\u003eसंस्कृतिसंगमाची प्रक्रिया गतिमान झालेली असली तरीही आपल्याला प्रत्येक संस्कृतीतले बारकावे समजण्याइतपत भिन्त्र संस्कृतींची खोलवर ओळख होतेच असे नाही. त्या त्या संस्कृतीच्या या बारकाव्यांशी नाते जडण्यासाठी कलाकृती पूरक ठरतात. 'चित्रबंध' है पुस्तक म्हणजे जगभरातील विभिन्न भाषांना, संस्कृर्तीना चित्रपटकथांच्या माध्यमातून जोडणारा एक धागा आहे. लेखक अमोल उकिडवे यांची वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट पाहण्याची अनावर ओढ, चित्रपट समजून घेण्यासाठीची अथक साधना आणि आपल्याला समजलेले आणखी अनेकांपर्यंत पोचवण्याची जबरदस्त ऊर्मी यांतूनच चित्रबंध' साकारले आहे.\u003cbr\u003eचित्रपट अभ्यासकांनी आणि चाहत्यांनी हे पुस्तक जरूर वाचावेच; पण त्याचबरोबर जगभरातील संस्कृतींविषयी कुतूहल असलेल्यांना आणि व्यवसाय नोकरीच्या निमित्तानं विविध संस्कृतींशी संपर्क येणाऱ्यांनाही 'चित्रबंध' समृद्ध करेल. नवनव्या विषयांवरील पुस्तकांचा शोध घेणाऱ्यांसाठी तर हे पुस्तक म्हणजे एक पर्वणीच !\u003cbr\u003e● अनेकरंगी संस्कृतींतील अनवट चित्रपटांच्या कथांचे पेटारे खुले करणारा संग्रह !\u003cbr\u003e- गिरीश कुलकर्णी\u003cbr\u003eराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक - अभिनेता\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45796449255507,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_93b0aa6f-2b5f-4764-a806-41f440d27381.jpg?v=1783497837","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chitrabandh-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-by-amol-ukidve-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%89%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}