Skip to product information
covert| कोव्हर्ट By A. S. Dulat,Asad Durrani,Neil K. Aggarwal,Milind Champanerkar | ए. एस. दुलत , असद दुर्रानी , नील. के. अग्रवाल,मिलिंद चंपानेरकर
Sale price  Rs. 416.00 Regular price  Rs. 520.00
Pages: 271
Language: Marathi

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दीर्घकाळ वैरभाव कायम राहिला. मात्र असं असूनही या दोन देशांच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी -भारताच्या ‘रॉ’चे ए.एस. दुलत आणि पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे असद दुर्रानी यांनी संयुक्तपणे ‘द स्पाय क्रॉनिकल्स’ (२०१८) हे पुस्तक लिहावं आणि शांतता-प्रयत्नांचा ध्यास घेऊन गेली अनेक वर्षं सक्रियपणे कार्यरत राहावं, ही गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानसशास्त्रज्ञांना अभूतपूर्व आणि एक आगळा परिपाठ निर्माण करू पाहणारी वाटली.

त्यामुळेच त्या मानसशास्त्रज्ञांच्या पुढाकाराने दुलत आणि दुर्रानी यांच्या समवेत अनेक चर्चासत्रं आयोजित केली गेली. या चर्चासत्रांत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नील कृष्णन अग्रवाल यांची नियामक-संवादक म्हणून महत्त्वाची भूमिका राहिली. या उपक्रमातून प्रेरणा घेऊनच प्रस्तुत पुस्तक साकार झालं.

भारत-पाकिस्तान या दोन देशांचा इतिहास, संस्कृती यांमध्ये सामाईकता असूनही त्यांच्यामध्ये इतका वैरभाव का आहे, याचा सखोल ऊहापोह या संवादपर पुस्तकातून साधला गेला आहेच, पण त्याचप्रमाणे ‘दर्शनी’ वाटाघाटींच्या स्वरूपाबाबतही हे पुस्तक अंतः दृष्टी प्राप्त करून देतं.

दक्षिण आशियात शांतता आणि सद्भाव नांदण्याचं मोल जाणणाऱ्या सर्वांसाठी डोळे उघडणारं आणि आवर्जून वाचावं असं पुस्तक -कोव्हर्ट…

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

covert| कोव्हर्ट By A. S. Dulat,Asad Durrani,Neil K. Aggarwal,Milind Champanerkar | ए. एस. दुलत , असद दुर्रानी , नील. के. अग्रवाल,मिलिंद चंपानेरकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like