Skip to product information
Dalit Files| दलित फाईल्स By Sharankumar Limbale| शरणकुमार लिंबाळे
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 500.00
Language: Marathi

'दलित फाईल्स' ही शरणकुमार लिंबाळे यांची नववी कादंबरी आहे. 'सेक्स आणि जात' या विषयाला ही कादंबरी धीटपणे भिडताना दिसते.
हिंसा, जघन्य अपराध, अमानुष अत्याचार, जीवघेणी अंधश्रद्धा, प्रतिकूल परिस्थिती, जगण्यातला चिवट संघर्ष आणि भयानक जातीय तेढ यामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. 'दलित जाणीव आणि दलित अनुभव' ही तर लिंबाळ्यांच्या लेखनाची शक्ती आहे.
समाज, चळवळ आणि कार्यकर्ता ही त्यांच्या लेखनाची ऊर्जा आहे. ओघवती भाषा, काव्यात्मक शैली, वेधक वर्णन आणि वैचारिक वाद-विवाद यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. 'दलित फाईल्स' ही कादंबरी वाचताना मनावर ताण येतो; अपेक्षाभंग होतो आणि मन अंतर्मुख होते. ही कादंबरी विलक्षण अनुभवांचा प्रत्यय देणारी झाली आहे.
- लक्ष्मण गायकवाड
'उचल्या'कार

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Dalit Files| दलित फाईल्स By Sharankumar Limbale| शरणकुमार लिंबाळे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like