{"product_id":"dhasalanchi-kavita-shaili-aani-shailivijnyan","title":"ढसाळांची कविता : शैली आणि शैलीविज्ञान | Dhasalanchi Kavita : Shaili Aani Shailivijnyan","description":"\u003cp\u003eप्रा. विनोद जीवनतारे यांचा पीएच. डी. चा विषय ‘ढसाळांची कविताः शैली आणि शैलीविज्ञान’ हा प्रबंध ग्रंथरुपाने प्रकाशित होत आहे याचा अत्यानंद होत आहे. प्रा. जीवनतारे जवळजवळ वीस-एकवीस वर्षांपासून मराठी साहित्याच्या क्षेत्रात अध्ययन, अध्यापन आणि संशोधन यांत कार्यरत आहेत. विशेषतः ते मराठी वाङ्मयात नवे संकेत, नवे विचार आणि मानवी मूल्ये रुजविण्यार्‍या क्रांतिकारी, जीवनपूर्णताशील आंबेडकरवादी साहित्याचे अभ्यासक, चिंतनशील व्यक्तीमत्त्व आहे. प्रस्तुत ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वी त्यांचे जवळजवळ चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. नामदेव ढसाळ यांची मराठी काव्यप्रांतात, परिवर्तनवादी, विद्रोही कवि-कलावंत म्हणून स्वतंत्र ओळख आहे. त्यांची बुद्धीवादी, मानवी मूल्यनिष्ठा आणि वाङ्मयीन सैद्धांतिक तत्त्वे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहेत. आंबेडकरवादी व मराठी कविता समृद्ध करण्यात त्यांचे प्रमुख योगदान आहे. ढसाळांच्या कवितेतील अनुभव हे जिवंत, रसरसित आणि नैसर्गिक माणूसकेंद्रित आहेत. त्यांची कविता समग्र जळजळीत, विषमतावादी समाजवास्तवाला निर्भिडपणे भिडते. त्यांच्या कवितेत नकार, वेदना, विद्रोह, चीड, संताप, अस्वस्थता येत असली तरी त्याबरोबरच मानवी मूल्यांचा स्वीकार, माणसाविषयीची निशंक सत्यनिष्ठ संवेदनशीलता आणि मैत्रीभावही व्यक्त होतो. म्हणूनच त्यांच्या कवितेला काव्यक्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या कवितेतची भाषा, संकेत, प्रतिष्ठा, वाक्प्रचार व म्हणी, मिथकं आणि व्यापक सामान्यजीवन जगतातले शब्द व भाषाप्रयोगही नव्या रुपाने मराठी कवितेते प्रथमतः प्रगट झाले. याबरोबरच त्यांच्या कवितेत काही प्रमाणात अशिष्ट भाषाप्रयोग व्यक्त झाल्यामुळे तिच्यावर प्रचंड टीकाही झाली आहे. प्रस्तुत ग्रंथाचा विषय लक्षात घेता एकूणच मराठी कवितेची काव्यसमीक्षा अशा स्वरुपाने फारच कमी प्रमाणात झालेली आपणास दिसून येते. या ग्रंथातून निश्चितच ढसाळांच्या कवितेच्या शैलिशास्त्रीय मीमांसेतून वाचकांना लाभ होईल अशी आशा वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391939667,"sku":"9.78936E+12","price":371.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Dhasalanchi_20Kavita_20Shaili_20Aani_20Vidnyan_20front.jpg?v=1795505105","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dhasalanchi-kavita-shaili-aani-shailivijnyan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}