कथा चाळिशी*
हा जन्म-मृत्यू, व्याधी, दुःख, स्वार्थ, परमार्थ अशा मानवी जीवनातील विविध आशयसूत्रांना स्पर्श करणाऱ्या सुरस आणि वाचनीय कथांचा संग्रह आहे. परिचित वाटणाऱ्या जगाकडे नव्या, अनपेक्षित नजरेने पाहायला लावणाऱ्या या कथा वास्तव आणि फँटसी यांच्या दोन टोकांमध्ये सहजपणे पूल बांधतात. प्रत्येक कथा वाचकाची उत्सुकता जागी ठेवते; कधी विचार करायला भाग पाडते, कधी धक्का देते, तर कधी हसवते किंवा अंतर्मुख करते. प्रसिद्ध नाटककार नोएल कॉवर्ड यांनी सांगितल्याप्रमाणे वाचकाला क्षणभरही कंटाळा येऊ न देणे हे उत्तम लेखनाचे लक्षण. कथा चाळिशीतील कथा हेच सूत्र प्रभावीपणे सार्थ ठरवतात.
*गवसलेल्या गोष्टी**
परदेशी भाषांतील कथा वाचताना काही वर्षांपूर्वी अशा काही कथा वाचनात आल्या की, त्या वाचून काहीतरी अद्भुत गवसल्याचा आनंद झाला. या कथा आपल्या देशापासून हजारो मैल दूरच्या भूमीत घडणाऱ्या; काही तर शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील. तरीही त्या परक्या वाटल्या नाहीत. उलट त्या आपल्या माणसांच्या, आपल्या भावभावनांच्या आणि साऱ्या जगाच्या कथा वाटल्या. काळ आणि भौगोलिक सीमा ओलांडून त्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही ठरतात. अशा सार्वकालिक कथांचा आनंद आपल्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचवावा, या इच्छेतून या कथांच्या अनुवादाचा आणि या संग्रहाचा जन्म झाला आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours