Skip to product information
सुनील पांडे लिखित ‘एक होती यशोदा’ या कादंबरीचे कथानक अतिशय सरळ आहे. त्यात कुठलेही रहस्य नाही, थरार नाही. ही कादंबरी मराठीतील ख्यातनाम लेखक गो.
नी. दांडेकर यांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या कादंबरीवर आधारित लिहिली आहे. ही कादंबरी खूप गाजलेली आहे.
या कादंबरीतील यशोदा आणि अप्पा ही पात्रे सुनील यांनी त्यांच्या कल्पनेने पुढे नेलेली आहे. मराठी भाषेत केलेला हा अद्वितीय असा प्रयोग आहे. एक साधे, छोटेसे कथानक वाचकावर गारुड करते, नर्मदेच्या तीरावरची आणि त्या प्रदेशातील वेगळ्या ढंगाची भाषाही वाचकाला लुभावणारी आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours