Skip to product information
एका पेक्षा एक | Eka Peksha Ek by सुधीर सुखठणकर | Sudhir Sukhthankar
Sale price  Rs. 144.00 Regular price  Rs. 160.00
Language: Marathi

सुधीर सुखठणकर हे आजच्या मराठी साहित्याच्या विनोददालनातील एक आघाडीचं नाव आहे. त्याचबरोबर एक सक्षम कथाकार म्हणूनही त्यांच्या लेखनाकडे पाहिलं जातं. समाजमनाला स्पर्शून जाणारा कुठलाही विषय सुखठणकरांना आपलासा वाटतो व तो कथेतून मांडण्याची त्यांची हातोटी अशी, की ते वाचकालाही आपलसं करून टाकतात.

सुखठणकरांची प्रसन्न, आनंदी शैली, पुस्तकभर पसरलेले कथांतील पात्रांचे खटकेबाज तरीही सहजसुंदर संवाद सुरुवातीपासून अखेरपर्यंत वाचकाशी नातं जुळवत मस्त साथसोबत करतात. प्रस्तुत कथासंग्रहात, विवाह जमविण्याच्या पद्धतीत होत चाललेला बदल, नवरेशाहीशी झुंज देण्याची आधुनिक स्त्रीची मानसिकता, टीव्हीमालिकामय जीवन जगण्याकडे वाढत चाललेला कल, अशा विविध नावीन्यपूर्ण विषयांवरील कथांचा समावेश केलेला आहे. बँकखातेदारांची झालेली घबराट, ङङ्गब्रेकिंग न्यूजवाल्यांचा धूमाकूळ यांचंही चित्रण आहे.

सेझ, मराठी माणसाची पीछेहाटसारख्या गंभीर राजकीय, सामाजिक समस्यांभोवती कथा गुंफताना सुखठणकरांनी विषयाचं गांभीर्य तसूभरही कमी होऊ न देता वाचकांच्या चेहर्‍यावरील हसू कायम राहील याची सहजतेने दक्षता घेतली आहे. सुखठणकरांच्या लेखनाचा तो गुणविशेषच आहे. अशा विविध गुणांनी समृद्ध अशा या सर्वच कथा वाचकांना ङङ्गएकापेक्षा एक सुंदर वाटतील, अशी अपेक्षा आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Ekapeksha Ek | एकापेक्षा एक

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like