{"product_id":"emozeal","title":"इमोझील | Imojhil","description":"\u003cp\u003eमनोबल उंचावणाऱ्या कथा करोनाच्या संकटकाळात जागतिक स्तरावरील मानवी जीवनाला एक नवीन वळण मिळाले . सर्व स्तरांतील जनतेपुढे नवी आव्हानं उभी राहिली . आणि त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक आव्हान हे आत्मपरीक्षणाची एक संधी असते , हेही या काळात प्रकर्षाने जाणवून गेलं . जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीने कमी अधिक प्रमाणात मानसिक दोलायमान स्थिती अनुभवली . सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले , अडखळत , धडपडत का असेना , पण या काळात त्यांनी नव्या दिशा शोधल्या , असे सर्व दर्शविणाऱ्या कहाण्या म्हणजेच ‘ इमोझील ‘ अर्थात मनोबल उंचावणाऱ्या कथा . वैद्यकीय सल्लागार डॉ . महेश अभ्यंकर आणि मानसिक विकास सल्लागार आरती भार्ज ह्यांनी ह्या काळात केलेल्या समुपदेशनावर आधारित या बारा कथा आहेत . या कहाण्या कुठल्याही कठीण काळात मार्गदर्शक ठरतील अशा आहेत . SP ह्या कथांतील पात्रांकडून तुम्हाला नवी उमेद , आयुष्य जगण्यासाठी नवीन दिशा मिळत राहील . नवनिर्माण करण्याची शक्ती आपल्याकडे आहे याची जाणीव होईल . ‘ आपल्यातील सुप्त मानसिक बळ ओळखा आणि सजगतेने कार्यरत राहा …. ‘ हेच सूत्र आपलं मनोरंजन करता करता सांगणारा कथासंग्रह ‘ इमोझील ‘ . आयुष्य एक निरंतर प्रवास , आशा , अपेक्षा , भावना आणि भास एक दिवस सूर्योदय आपला असेल मनात ठेवावा नेहमी हा विश्वास !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232530591827,"sku":"978-93-92374-03-6","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/EmozylFront-1.jpg?v=1795070492","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/emozeal","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}