Skip to product information
Gabochya Gavat| गाबोच्या गावात By Sunil Tambe| सुनील तांबे
Rs. 350.00
Pages: 160
Language: Marathi
Overview:
जगभरातील वाचकांना आपल्या मॅजिक रिअलिझमने भुरळ घालणारे  थोर कोलंबियन लेखक गॅब्रियल गार्सिया मार्केझ ऊर्फ गाबो यांच्या  साहित्याची मुळे नेमकी कुठे रुजली असतील? कोलंबियातील तो  धूळभरला रस्ता, ती पिवळी फुलपाखरे आणि बुएंडिया कुटुंबाचा  पिढ्यानपिढ्यांचा एकाकीपणा केवळ कल्पनाविलासातून जन्मला  होता की त्यामागे वास्तवाचे काही टोकदार संदर्भ होते ? या प्रश्नांचा  वेध घेणारी सुनील तांबेंची ही परिसरयात्रा म्हणजे मराठी ललित  लेखनातील एक अपूर्व आणि शोधक ठेवा आहे. या पुस्तकाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे लेखकाने लावलेला तौलनिक  अन्वय. परदेशी साहित्य वाचताना आपल्याला वैश्विक आशय तर समजतो,  पण तिथल्या मातीतील समाज आणि त्यातील अंतर्विरोध समजण्यासाठी त्या  भूमीचा स्पर्श हवा असतो. सुनील तांबे यांनी स्पॅनिश लोकांची कास्टा सिस्टीम  (जातिव्यवस्था) आणि तिचे लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा सारख्या कादंबरीत  उमटलेले प्रतिबिंब ज्या नेमकेपणाने टिपले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. सुनील तांबे यांची शैली ही पत्रकारितेची अचूकता आणि ललित साहित्याची  तरलता यांचा सुरेख संगम आहे. साहित्यातील स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून  मानवी स्थितीगती आणि जादुई वास्तव समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक  रसिक वाचकासाठी 'गाबोच्या गावात' हे पुस्तक म्हणजे एक विस्मयकारी  अनुभव आहे. - डॉ. सतीश वाघमारे

You May Also Like