{"product_id":"gachakandhari-गचकअंधारी-by-ashok-manakar-अशोक-मानकर","title":"Gachakandhari|गचकअंधारी By Ashok Manakar | अशोक मानकर","description":"\u003cp\u003eविनोदी कथालेखनाच्या प्रांतातलं लक्षणीय नाव म्हणजे अशोक मानकर. मानकरांच्या कथेनं वन्हाडातल्या अस्सल ग्रामीण जीवनाची नाळ जोखलेली आहे. हा विनोद लोकरंजन वा वाचकानुनयाच्या हलक्याफुलक्या जाणिवेतून येत नाही. तो अस्सल आहे.\u003cbr\u003eपर्यावरण, समाजकारण, राजकारण, राज्यव्यवस्थेची ध्येयधोरणं आणि जागतिकीकरणाच्या चक्रात हेलकावे खाणारं ग्रामीण जीवन मानकर तटस्थपणे, तेवढ्याच मिष्कीलपणे चित्रित करतात. अद्भुत आणि विलक्षणतेची त्याला जोड देतात. त्यातून उत्कट, विलोभनीय आणि सामर्थ्यसंपन्न अशी कथा उदयाला येते. एका बाजूनं ती निश्चित हसवते, पण त्याचवेळी डोळ्यांत कुठेतरी आसूही आणते.\u003cbr\u003eवन्हाडातली बोलीभाषा हे मानकरांच्या कथेचं वैभव आहे. ही बोली मूळ नक्षीसह उभी करण्यात मानकरांचा हातखंडा आहे. विविध घटना, प्रसंग, स्मरणवैशिष्ट्यं प्रांतून झिरपलेला अस्सल ग्रामीण वऱ्हाडी विनोद या संग्रहातल्या प्रत्येक कथेच प्राण आहे.\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45697845624915,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_65fc688c-6ec0-44dd-b3d5-4b89f597e6ce.jpg?v=1781341985","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gachakandhari-%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-by-ashok-manakar-%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}