{"product_id":"gamak-yashache","title":"गमक यशाचे | Gamak yashache","description":"\u003cp\u003eही आहे एक गोष्ट तुमच्या – आमच्यासारख्याच एका माणसाची . प्रश्न पडलेले असतात यशस्वी तर व्हायचंय , पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ? खरंच , यश नशिबावर अवलंबून असतं का ? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का ? …. पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते ! तो मार्गदर्शक त्याला प्रसिद्ध व्यक्तींचे दाखले देतो , समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात , यश हे निढळाचा घाम गाळून , भीतीवर मात करून आणि आलेल्या संधीचं सोनं करून मिळवायचं असतं . स्वप्नांचा , इच्छा – आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं …. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल ; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल ; अर्थात , तुम्हाला असामान्य होण्याची , काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल ; ध्यास असेल , तरच …. !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232621424723,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/GamakYashacheFront-1.jpg?v=1795071146","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gamak-yashache","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}