Skip to product information
Gangadevivirachit Madhurāvijayam Mahākāvyam Athava Madhurāvijayam Mahākāvyam| गंगादेवी विरचित मधुराविजयम् महाकाव्य अथवा वीरकम्परायचरितम् (सटीप मराठी भाषांतर) सर्ग १ आणि २ By Nirmal Ravindra Kulkarni|  निर्मला रवींद्र कुलकर्णी
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 152
Language: Marathi

आठव्या-नवव्या शतकापासून सुमारे १२ व्या-१३ व्या शतकापर्यंत दक्षिण भारतात अनेक लहान लहान पण महत्त्वाची राजघराणी होऊन गेली. या राजघराण्यांनी दक्षिण भारताला सांस्कृतिक ओळख दिली. देवगिरीचे यादव, द्वारसमुद्राचे (आजच्या हळेबिडचे) होयसळ, वरंगळचे काकतीय, मद्राईचे पांड्य इ. राजघराण्यांनी दक्षिण भारत घडवला. १३ व्या शतकानंतर मात्र अल्लाउद्दिन खिलजी, त्याचा सेनापती मलिक कफूर, आणि त्यानंतर तुघलक राजवंशाने जवळपास संपूर्ण भारतदेश काबीज केला. अशा अत्यंत कठिण प्रसंगांमध्ये हरिहर आणि बुक या बंधुद्वयीनं कर्नाटकात हिंदूंचं स्वतंत्र साम्राज्य स्थापन केलं. विजयनगरच्या या साम्राज्यानं सायणाचार्यांच्या वेदभाष्यमालिकेबरोवरच इतर कलांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. समाजात आदर्शवाद बिंबवण्याचा प्रयत्न केला. या आदर्शवादाचंच एक दृश्य फल म्हणजे या साम्राज्यात कवयित्रींना मिळालेलं प्रोत्साहन. इ. स. १० व्या शतकानंतर खंडित झालेली कवयित्रींची प्रतिभा या साम्राज्यात पुन्हा प्रवाहित झाली. बुक्कराजाची सून गंगादेवी हिनं लिहिलेलं 'मधुराविजयम्' हे महाकाव्य आज उपलब्ध असलेले एका बीनं लिहिलेलं बहुधा पहिलंच महाकाव्य आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Gangadevivirachit Madhurāvijayam Mahākāvyam Athava Madhurāvijayam Mahākāvyam| गंगादेवी विरचित मधुराविजयम् महाकाव्य अथवा वीरकम्परायचरितम् (सटीप मराठी भाषांतर) सर्ग १ आणि २ By Nirmal Ravindra Kulkarni| निर्मला रवींद्र कुलकर्णी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like