Skip to product information
चंद्र, तारे, शितल चांदणं नि पर्वतराजीतून थिबकणारा पाऊस... सप्तरंगांचं अपूर्व इंद्रधनुष्य, ही सारी वर्णनं कथा-कादंबर्यांना अधिक जिवंत करतात, फुलवतात; पण सृष्टीतील या रूपकांना कथांचं नायकत्व प्रदान करणं, या रूपकांची कथांमध्ये सहज, ओघवती पेरणी करत; त्याभोवती सारी कथा ओवणं...
हे रोहिणी कुलकर्णींचं सिद्धहस्त कसबच म्हणावं लागेल. स्त्री-मनाच्या तरल संवेदना आणि सृष्टीतील नाना आलाप-विलाप, यांचं अनोखं अद्वैत त्या साधतात.
आणि नितळ, निवळ, उत्फुल्ल अनुभूतीचा झरा वाचकाच्या मनात खळाळत राहतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours