Skip to product information
Overview:
प्रत्येक निवडणूक स्वतंत्रपणे मांडून हा इतिहास सांगता येणार नव्हता. निवडणुका आणि आकडेवारी यांच्या पलीकडे जाणारा हा प्रवास होता. त्यामुळे हे लेखन विभागून करणे शक्य नव्हते. अधिक कष्ट पडणार हे निश्चित होते, पण हा संपूर्ण प्रवास एकट्यानेच पार पाडावा लागणार होता. निवडणुकांचा इतिहास लिहिताना निवडणूक आयोगाच्या अहवालांतून अधिकृत आकडेवारी उपलब्ध होत गेली. मात्र त्या अहवालांचा उद्देश राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणे नव्हता. त्यामुळे त्या काळातील राजकीय पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी अनेक पुस्तके, संदर्भग्रंथ आणि संशोधनपर साहित्य यांचा आधार घ्यावा लागला. विविध राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांतूनही अनेक महत्त्वाचे संदर्भ मिळाले. लिहिताना एक गोष्ट जाणीवपूर्वक पाळली. लेखन माहितीपूर्ण असले तरी ते वाचनीय, प्रवाही आणि रटाळ न वाटणारे असावे, याची काळजी घेतली. त्यामुळे मालिका क्रमशः न मांडता, निवडणूक प्रक्रियेच्या विविध पैलूंवर स्वतंत्र लेख लिहिले. या पुस्तकात मात्र ते सर्व विषय कालानुक्रमाने आणि अधिक सुसंगत पद्धतीने मांडले आहेत. या प्रवासात अनेक महत्त्वाच्या आणि रंजक घटनांचा मागोवा घ्यावा लागला. काही गोष्टी ऐकीव स्वरूपात प्रचलित होत्या; त्यामागील वस्तुनिष्ठ संदर्भ शोधण्यासाठी स्वतंत्र मेहनत घ्यावी लागली. भारतीय निवडणुकांच्या इतिहासाचा समग्र आढावा घेणारे पुस्तक इंग्रजी, हिंदी किंवा मराठीत उपलब्ध नाही, हे मी आधी नमूद केले आहे. मात्र याचा अर्थ माझे हे पुस्तकच त्या इतिहासाचा अंतिम किंवा सर्वसमावेशक दस्तऐवज आहे, असा माझा दावा अजिबात नाही. सुमारे पंचाहत्तर वर्षांचा भारतीय निवडणुकांचा इतिहास हा इतका विशाल आणि बहुआयामी विषय आहे की, त्यावर कितीही लेखन किंवा संशोधन झाले तरी ते अपुरेच वाटेल. त्यामुळे हा अभ्यास भविष्यातही सतत विस्तारत राहणारी प्रक्रिया आहे. या निमित्ताने एका वेगळ्या आणि आव्हानात्मक विषयावर पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष आनंद आहे! • डॉ विजय चोरमारे, मनोगतात

Pickup available at HO
Usually ready in 24 hours