आचार्य अत्रे आणि कोल्हाटकर यांनंतर महाराष्ट्राला लाभलेलं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे . पुलंच्या विनोद्बुध्दीने महाराष्ट्राला गारुड घातलय ते पिढ्या दरपिढ्या कायम राहील हे मात्र निश्चित . गोळाबेरीज ह्या पुस्तकातील लेख निरनिराळ्या मासिकांत यापूर्वी आलेले आहेत. त्यांची पाने जमवून (बहुधा अशाश्वत) संग्रह केला आहे. यातील एका लेखाचा दुसऱ्याशी संबंध नाही. निरनिराळ्या जातीगोतींची, मतांची मंडळी एका चाळीत राहावी तसे हे लेख आता एकत्र राहायला आले आहेत. त्यांचे एकमेकांशी जमले तर ठीक. नाही जमले तर शिशिरात झाडांची पाने पटापट गळून जातात व नामशेष होतात, तशी ही पानेदेखील नामशेष होतील. ह्या पुस्तकाचे भवितव्य आता प्रिय वाचक आणि त्यांच्या घरांतले बालबच्चे यांच्या हाती आहे. त्यांनी त्याचा यथायोग्य आदर करावा. गोळाबेरीज मध्ये पुलंचे एकूण तेरा लेख एकत्रित केले आहे , ज्यामध्ये म्हैस, एक नवे सौन्दर्यवाचक विधान, सर्दी, दिवंगत गंधाचा मागोवा या लेखांचा समावेश आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours