Skip to product information
Ikigai | Good Vibes, Good Life by Ken Mogi, Vex King avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 495.00 Regular price  Rs. 550.00
Pages: -
Language: Marathi

इकिगाई हेच जपानमधील लोकांचं सकाळी उठण्यामागील प्रयोजन आहे.’ ‘तणावहीन, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनशैलीचा जपानी मूलमंत्र : इकिगाई.’ – द टाइम्स हे प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी अधिक समर्पक आणि पूरक ठरतं. या तत्त्वज्ञानामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकायची क्षमता आहे- ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल. सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या : कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा… तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा… तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या… छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा… तुमच्यामधील इकिगाई ओळखण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी या असाधारण पुस्तकातील केन मोगी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरेल. ————————————————————————————————————————- आता आहात त्यापेक्षा शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीत रूपांतरित व्हा! स्वत:वर निखळ प्रेम करायला कसं शिकाल? नकारात्मक भावनांचे रूपांतर सकारात्मक भावनांत कसं कराल?

चिरस्थायी आनंद मिळवणे शक्य आहे का? या पुस्तकात इन्स्टाग्राम गुरू वेक्स किंग तुमच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देतील. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून वेक्स यशस्वी झाले आणि हजारो तरुणांसाठी दीपस्तंभ ठरले. आता स्वानुभव आणि अंतर्ज्ञानी सुज्ञपणा यातून ते तुम्हालाही यासाठी प्रेरित करीत आहेत : • स्वत:ची काळजी कशी घ्यावी, नकारात्मक ऊर्जेच्या कचाट्यातून कसे बाहेर पडावे आणि स्व-कल्याणास कसे प्राधान्य द्यावे? • जागरूकता व ध्यानधारणेसहित सकारात्मक जीवनशैलीच्या सवयी कशा अंगीकाराव्यात? • आपले ध्येय प्रकट करा आणि विविध तंत्रांचा वापर करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

• आयुष्यात महान संधींना आमंत्रित करण्यासाठी स्वत:च्या श्रद्धा कशा बदलाल? • भीतीवर मात करा आणि वैश्विक प्रवाहाशी स्पंदने जुळवा. • आपला उदात्त हेतू शोधा आणि इतरांसाठी दीपस्तंभ बना. आपले विचार, भावना, शब्द व कृती या सगळ्यांची पद्धत बदलली की, तुम्ही जग बदलायला कसे सुरू करता हे वेक्स तुम्हाला या पुस्तकातून दाखवतील. “जे लोक अंधारात रस्ता शोधण्यासाठी चाचपडत आहेत आणि ज्यांना अधिक सुंदर व अर्थपूर्ण आयुष्य जगायचे आहे त्यांच्यासाठी प्रस्तुत पुस्तक उत्कृष्ट मार्गदर्शक ठरेल.” हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Ikigai | Good Vibes, Good Life

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like