{"product_id":"gramophone-girls-vol-1-2-set-by-dr-nandita-date","title":"Gramophone Girls Vol 1 \u0026 2 (Set) | ग्रामोफोन गर्ल्स भाग १ व भाग २ (संच) by Dr Nandita Date |  डॉ. नंदिता दाते","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eसोळाव्या शतकातील अविभाजित हिंदुस्थानाच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलेल्या आणि पुढे अठराव्या शतकात केवळ उच्चभ्रू समाजासाठी आपली कला सादर करणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांना जगाने \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'तवायफ'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e म्हणून ओळखलं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eलाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस, पटना, कलकत्ता ते मुंबई... या शहरांमधून तवायफांच्या \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eतहजीब\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eमौसिकी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e आणि अभिजात कलापरंपरेचा प्रवास घडत गेला. एकेकाळी समाजात मान, प्रतिष्ठा आणि प्रभाव असलेल्या या कलावंतांची परंपरा मात्र बदलत्या सामाजिक वास्तवात हळूहळू कलंकित झाली, उपेक्षित ठरली आणि विस्मृतीच्या पडद्याआड गेली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eपण इतिहासाची एक महत्त्वाची नोंद आजही अजरामर आहे—एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eग्रामोफोनच्या तबकडीवर ध्वनिमुद्रित झालेले पहिले स्वर हे तवायफांचेच होते.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eजानकीबाई, गौहरजान, मेहबूबजान, कज्जन, मोतीबाई, असगरी, सिद्धेश्वरी देवी अशा असंख्य गायिकांनी ठुमरी, दादरा, गझल आणि इतर अभिजात संगीतप्रकार घराघरांत पोहोचवले. लाखेच्या तबकड्यांवर कोरलेले त्यांचे स्वर म्हणजे काळावर उमटलेली अमिट \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eस्वर-स्वाक्षरी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eतवायफांच्या संघर्षमय आयुष्याचा, शाही दरबारापासून कोठा, रंगमंच, ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका आणि पुढे चित्रपटसृष्टीपर्यंतच्या त्यांच्या कलाप्रवासाचा हा अभ्यासपूर्ण आणि रोमहर्षक मागोवा...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'ग्रामोफोन गर्ल्स'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभाग १\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e – लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभाग २\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e – गया–पटना, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Bookganga Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45740525158483,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/wmremove-transformed_12.jpg?v=1782572431","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gramophone-girls-vol-1-2-set-by-dr-nandita-date","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}