{"product_id":"gurugaurav","title":"गुरुगौरव | Gurugaurav","description":"\u003cp\u003eमहापुरुषांच्या विचारांना समाजमनात रुजविण्यासाठी त्या त्या काळात ज्या ज्या प्राथमिक शिक्षकांनी काम केलं त्या त्या विचारवाहक शिक्षकांमुळे नवनव्या पिढ्यांची जीवनवाट समृद्ध होत गेली. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिकपणे कार्यरत राहत दादासाहेब शिवाजी गायकवाड गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांसोबतच समाजमनाला, सामाजिक स्थितीला बदलविण्याचा आणि ऐतिहासिक मूल्य रुजविण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या एकूणच कार्यातून स्पष्ट होत जातो. भारतीय समाजमनाला घडविणार्‍या नवसमाज निर्मिती करणार्‍या सिद्धार्थ गौतमबुद्ध, छत्रपती शिावजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ह्या महापुरुषांना आम्ही पाहू शकले नाहीत, परंतु त्यांच्या कार्याचा वसा, विचारधारा समाजमनात रुढमान्य करण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या शिवाजी गायकवाड दादासारख्या गुरुजींनी आपल्या कार्यातून जो इतिहास निर्माण केला, करीत आहाता तो इतिहास सामाजिक भान जपणारा असाच आहे. तो आम्ही अनुभवतो आहोत, पाहत आहोत. त्यांच्या कार्याचा गौरवग्रंथ हा निश्चितच दिशादर्शक आणि नवकार्य करणार्‍या युवकांसाठी, कर्तव्यपूर्तीचा प्रामाणिक आनंद घेणार्‍यासाठी मार्गदर्शक असाच आहे. लेखणी आणि कृतीचा वसा घेतलेल्या शिवाजीराव दादांचा भूतकाळ हा अंधाराशी झुंज देत वर्तमानात प्रकाशवाट निर्माण करीत सूर्याचा उजेड पेरण्याचा ध्यास घेत मार्गक्रमण करणारा असाच आहे खूप शुभेच्छा ! -डॉ.मिलिंद विनायक बागूल\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281405833299,"sku":"9.78939E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Gurugaurav_20front.jpg?v=1795505279","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gurugaurav","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}