{"product_id":"harshyu-moththa-hotoy-हर्षू-मोठ्ठा-होतोय-by-suvarna-gokhale-सुवर्णा-गोखले","title":"Harshyu Moththa Hotoy | हर्षू मोठ्ठा होतोय By Suvarna Gokhale | सुवर्णा गोखले","description":"\u003cp\u003e'गर्भाशयात नाळेचा वेढा पडल्यामुळे हर्ष अपुऱ्या वजनाचा जन्माला आला. त्याची शारीरिक वाढ म्हणावी तशी नसल्यामुळे, इतरही अपेक्षित प्रगती होत नव्हती. म्हणून पूर्ण विचारानं, ठरवून आम्ही वर्षभर हपूंची 'घर-शाळा' सुरू केली.\u003cbr\u003eएकदा त्याचा अभ्यास घेत होते. हर्षेला कवितेवरचे प्रश्न लिहायला सांगितले होते. कवितेचा विषय होता, 'मुंग्या'! प्रश्न होता, मुंग्यांचे गुण-दोष सांगा. हर्ष म्हणाला, \"त्या फारच शिस्तीत असतात.\" मी म्हटलं, \"बरोब्बर... आता दोष सांग.\" तर तो चमकून म्हणाला, \"मग आत्ता काय सांगितलं?... आता गुण सांगतो!\" हे उत्तर त्यानं चुकून नव्हे, जाणिवेतून दिलेलं होतं.'\u003cbr\u003eहर्पूसारख्या 'वेगळ्या प्रकारे प्रज्ञावंत मुलांच्या आयुष्यातल्या निराळ्या गरजांमुळे कठीण काळ येऊ शकतो. तो ओळखून स्वीकारणं, त्यातून त्याला\/तिला स्वतःच्या ताकदी लक्षात आणून देऊन बाहेर पडायला मदत करणं फार फार महत्त्वाचं असतं. यासाठी समाजमान्य चौकटीबाहेर पडावं लागतं, तारेवरची कसरत करावी लागते, अत्यंत विचारपूर्वक संघर्ष हाताळावे लागतात....\u003cbr\u003eहर्षचे आई-बाबा, भाऊ, आजी या सगळ्यांनीच हे आव्हान स्वीकारून आनंदानं पेललं. हर्षांच्या मोठ्ठा होण्याकडचा हा कमालीचा मनोज्ञ प्रवास जेवढा रंजक, तेवढाच विचारांना प्रवृत्त करणारा, आत्मचिंतन करायला लावणारा....\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45800244052051,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_8cab1709-5882-4dbc-95ef-113623e3ad3c.jpg?v=1783586252","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/harshyu-moththa-hotoy-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%af-by-suvarna-gokhale-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%96%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}