{"product_id":"haveche-ghatak-by-pr-deoba-shivaji-patil","title":"Haveche Ghatak | हवेचे घटक  By Pr Deoba Shivaji Patil | प्रा देवबा शिवाजी पाटील","description":"\u003cp\u003eबालमित्रांनो ! हवा जरी आपणास दिसत नसली तरी हवेशिवाय आपण जगू शकत नाही हे आपणा सर्वांना माहितच आहे. अशा ह्या हवेमध्ये नत्रवायू, प्राणवायू, उद्धन वायू, कर्बवायू, निष्क्रिय वायू जसे हेलियम, अर्गोन, निऑन, झेनॉन, क्रिप्टॉन तसेच पाण्याची वाफ, धूळ, धूर असे अनेक घटक असतात. ह्या सर्व घटकांची माहिती वैज्ञानिक दृष्टिकोनातून परंतु विज्ञानाची क्लिष्टता टाळून तुमच्यासाठी साध्या सोप्या भाषेत 'हवेचे घटक' बालकुमारकाव्यसंग्रहात कवीने सांगितली आहे. विज्ञान जर यमकबध्द नादमय कवितांमधून मुलांना शिकविले तर त्या कविता गुणगुणतांना मुलांच्या चांगल्या लक्षात राहतात म्हणजे पर्यायाने त्यांना विज्ञानही चांगले समजते व त्यांच्या लक्षात राहतेसुध्दा. ह्या\u003cbr\u003e'हवेचे घटक' ह्या विज्ञानाधारित बालकुमारकाव्यसंग्रहाचा मराठी बालसाहित्य क्षेत्रात सर्वप्रथम केलेला हा अभिनव प्रयोग असून ह्या कवितांमधून वरील उद्देश पूर्णपणे सफल झाला आहे. विशेष म्हणजे ह्या कवितांमधून हवेचे महत्व, वैशिष्ट्ये, गुणधर्म प्रतिपादित विविध वायूंच्या निर्मतिीप्रक्रियांसोबत हवेचे कसकसे प्रदुषण होत आहे नि ते मानवास कसे घातक ठरत आहे तेही सांगून हवा सदैव शुध्द राखण्याचे आवाहनसुध्दा केले आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांना व अभ्यासू पालकांनाही अतिशय उपयुक्त आहे.\u003cbr\u003eह्या काव्यसंग्रहातील सर्वच कविता खूपच छान, सुंदर, रंजक, विज्ञानदायी व ज्ञानवर्धक आहेत. मला 'हवेचे घटक', 'प्राणवायू' व 'नत्रवायू' ह्या तीन कविता खूपच आवडल्यात. तरी प्रत्येक विद्यार्थ्याच्या संग्रही अवश्य असावे नि प्रत्येकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक शालेय स्तरावर पुरक वाचन म्हणूनसुध्दा खूप महत्वपूर्ण योगदान देणारे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Yashashree Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45953499889747,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_2_e3de2d9b-865d-4176-a274-7027476c9a72.jpg?v=1786534624","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/haveche-ghatak-by-pr-deoba-shivaji-patil","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}