Skip to product information
he Haunting of Hill House| द हाँटिंग ऑफ हिल हाऊस By Shirley Jackson, Sayali Paranjape| शर्ली जॅकसन, सायली परांजपे
Rs. 350.00
Language: Marathi

कोणताही सजीव फार काळ, संपूर्ण वास्तवात, डोकं ठिकाणावर ठेवून राहू शकत नाही; काहींच्या मते तर भारद्वाजासारखे पक्षी आणि नाकतोड्यासारखे कीटकही स्वप्नं बघतात. हिल हाऊस मात्र, शहाणपण गमावून, पण किर्र अंधार पोटात घेऊन त्या टेकडीसमोर उभं होतं... ऐंशी वर्षांपासून, आणि कदाचित आणखी ऐंशी वर्षंही तसंच उभं! घराच्या आत भिंती सरळ उभ्या होत्या, विटा एकमेकींना व्यवस्थित चिकटून होत्या, फरश्या जागेवर घट्ट होत्या आणि दरवाजेही समजूतदारपणे बंद होते; हिल हाऊसमधल्या प्रत्येक लाकडावर, प्रत्येक दगडावर शांतता स्तब्धपणे पसरलेली होती. इथे जे काही वावरत होतं, ते एकटंच वावरत होतं.
ही नेमकी कुणाची गोष्ट आहे? भुताची?... अतृप्त आत्म्यांची?... या घरात राहता राहता मरण पावलेल्या माणसांची?... या घराची?... की आपल्याच मनात खोल दडून बसलेल्या भीतीची?... रुतून बसलेल्या अपराधीपणाची?... की अंगावर कोसळलेल्या एकटेपणाची?... प्रश्न अनेक आणि उत्तर एक... की उत्तरं अनेक आणि प्रश्न एक?
फक्त घराचा नाही, तर मनाचा भुलभुलैय्या करणारी... सतत चकवा पाडत राहणारी ही कादंबरी मनाचा कब्जा घेतल्याशिवाय राहत नाही. आपण कब्जा द्यायला तयार आहोत का... प्रश्न फक्त एवढाच आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

he Haunting of Hill House| द हाँटिंग ऑफ हिल हाऊस By Shirley Jackson, Sayali Paranjape| शर्ली जॅकसन, सायली परांजपे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like