{"product_id":"healthy-shakahar","title":"Healthy Shakahar | हेल्दी शाकाहार","description":"\u003cp\u003eशाकाहाराला पूर्णाहाराचं रूप देऊ पूर्णाहार तयार करणं म्हणजे अवघड कृती व भरपूर साहित्य असलंच पाहिजे असं नाही. कमी तेल वापरूनही पदार्थ रुचकर व अधिक पोषणमूल्ययुक्त करता येतात. या दृष्टिकोनातून स्वयंपाकाच्या पद्धतीत केलेले बदल मृणाल तुळपुळे यांनी हेल्दी शाकाहार या पुस्तकातून सांगितले आहेत. नाश्ता व भोजनासाठीच्या विविध शाकाहारी पाककृती यात आहेत. विविध प्रांत व देशांमधील वैशिष्ट्यपूर्ण शाकाहारी आपणही या पुस्तकच्या मदतीनं तयार करू शकतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआहारतज्ज्ञ सुचेता लिमये यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे, आज आपल्या देशात जवळजवळ २० ते २४ टक्के लोक शाकाहार घेणं पसंत करतात. पण ते सारेच निरोगी आहेत का ? याचे उत्तर नाही असे आहे. शाकाहारी असले तरी कोणाच्या आहारात भाज्या व फळांचा समावेश अभावानेच असतो कर काहीजण धान्यपदार्थांवर भर देताना दिसतात. काहीजण दुग्धजन्य पदार्थ कमी सेवन करतात. याचबरोबर हल्ली गोड व तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण देखील वाढलेले दिसते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया सर्वांमुळे स्थूलता, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांचे प्रमाण आपल्या देशात वाढत चालले आहे. यांना जीवनशैलीमुळे होणारे आजार असे म्हणतात. या आजारांना जर आपल्यापासून दूर ठेवायचे असेल , तर दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. पुरेसा व्यायाम आणि संतुलित व पोषक आहार. हेल्दी शाकाहार या पुस्तकात लेखिकेने नेहमीच्या काही पदार्थांच्या कृती देऊन त्या आपण कशा हेल्दी करू शकतो , हे आपल्यासमोर सुंदर पद्धतीने मांडले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270549303379,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00393.jpg?v=1773818444","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/healthy-shakahar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}