'मला असं वाटतं की हा तुमचा उजवा हात जास्त काळ तुमचा राहणार नाही. मला समोर असं चित्र दिसतंय की कुठल्या तरी पिस्तुलाचा स्फोट होऊन हा हात जबर जखमी होणार आहे. त्या वेळी इतक्या वेदना होतील की, पुढचा हात कापून टाकावा लागेल.' मी लगेच पुढे म्हणालो : 'आणि सर, तुमचा हा हात मला विनंती करत आहे की, त्या भावी दुर्घटनेपासून त्याला वाचवा.' डग्लस हे ऐकून हसू लागले. अशा परिस्थितीत हसणार नाही, असा कोणी असू शकेल का? 'तुमचा हात मला असंही चित्र दाखवत आहे,' मी पुन्हा बोलू लागलो, 'त्या हाताला लॉटरीच्या एका क्रमांकाचं बक्षीस लागणार आहे, जे तुम्हाला खरं तर नको असेल; पण दैव आणि दुराग्रहामुळे तुम्ही ते घ्याल. त्या क्षणापासून तुमचे दुर्दैवाचे फेरे सुरू होतील. प्रथम तुम्ही उजवा हात गमवाल आणि तुमची मृत्यूकडे वाटचाल सुरू होईल.'
Pickup available at HO
Usually ready in 24 hours