Skip to product information
Rajmata Jijau Marathi Book | Isapnititil Chan Chan Goshti | Isapnititil Sanskar Goshti | Isapnititil Bodhpar Goshti | Isapnititil Majedar Goshti by Baba Bhand avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Author: Baba Bhand
Pages: -
Language: Marathi

एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये ! हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला. स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते.

छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच! भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून पारंपरिक कथा आपण ऐकलेल्या आहेत. या कथांनी मानवी जीवनमूल्यांची जपणूक करून मानवांवर संस्कार केले.

या कथांमध्ये इसापनीती कथांचा महत्त्वाचा वाटा आहे. इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षं या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात कसे वागावे, याचे ज्ञान आणि शिकवण दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासारविचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतिकथा आबालवृद्धांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Rajmata Jijau Marathi Book | Isapnititil Chan Chan Goshti | Isapnititil Sanskar Goshti | Isapnititil Bodhpar Goshti | Isapnititil Majedar Goshti

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like