आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सतत चालू असलेल्या संघर्षांपैकी एक म्हणून इस्त्रायल-हमास हिजबुल्लाह संघर्षाकडे पाहता येईल. हा संघर्ष खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक शत्रुत्व, विचारधारा आणि उदयास येत असलेल्या जागतिक युतींमुळे प्रभावित झाला आहे.
'इस्रायल-हमास-हिजबुल्लाह' हे पुस्तक या संघर्षाची सुरुवात, निर्णायक लढाया आणि त्याचे दूरगामी परिणाम यांचे सखोल विश्लेषण करते.
हे पुस्तक ऑक्टोबर २०२३ च्या युद्धाचे परीक्षण करते. हा एक असा निर्णायक टप्पा होता ज्याने या संघर्षाला एक नवीन दिशा दिली. त्याचबरोबर समकालीन युद्धतंत्रात सोशल मीडियाच्या वाढत्या भूमिकेचाही आढावा घेते. जिथे करण्यात येणारा प्रचार आणि दिशाभूल करणारी माहिती जागतिक कथानकांना आकार देत असतात. हे पुस्तक भारताच्या बदलत्या भूमिकेवरही प्रकाश टाकते, ज्यात ऐतिहासिक संबंधांपासून ते अधिकच ध्रुवीकरण झालेल्या जगातील राजनैतिक उपक्रमांपर्यंतच्या बाबींचा समावेश आहे.
सखोल संशोधन केलेले आणि सूक्ष्म बारकावे असलेले 'इस्रायल-हमास-हिजबुल्लाह' हे पुस्तक केवळ बातम्यांच्या मथळ्यांपुरते मर्यादित राहत नाही. तर ते जागतिक भू-राजकारणाला सतत आकार देणाऱ्या या युद्धावर अधिक अभ्यासपूर्ण दृष्टिक्षेप टाकणारे ठरले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours