Skip to product information
Jadoo Cinegeetanchi | जादू सिनेगीतांची By Dr. Rahul Deshpande |डॉ. राहुल देशपांडे
Rs. 350.00
Language: Marathi
आपण गाणी रोजच ऐकतो, सहज गुणगुणतो. त्यात रमतो! पण एखादं गाणं जेव्हा पडद्यावरच्या कलाकाराचं न राहता, तुमच्या-आमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाचं, एखाद्या भावनेचं गीत बनून जातं तेव्हा?
ही गाणी कधी आपल्या आठवणींना उजाळा देतात, कधी आपल्याच भावनांना शब्द देतात, तर कधी कठीण प्रसंगी नकळत, धीर देत, आपला हातही धरतात. कधी एखाद्या गाण्यात आपलीच कहाणी सापडते, तर कधी वर्षानुवर्षं ऐकलेलं एखादं गाणं एका नव्या प्रसंगात अचानक नव्याने उलगडतं. आपणही त्यात हरवून जातो.
 
गाण्यांची हीच जादू उलगडत आपल्या काही निवडक आवडत्या, अजरामर सिनेगीतांमधून आनंदी जगण्याची काही सूत्रं डॉ. राहुल देशपांडे या पुस्तकातून अतिशय काव्यात्मपणे व्यक्त करतात.
हिंदी आणि मराठी चित्रपटांतील लोकप्रिय गीतं, त्यामागच्या भावना आणि त्यातून उमटणारी जीवनदृष्टी यांचा वेध घेत ‘जादू सिनेगीतांची’ हे पुस्तक आपल्याला जगण्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतं; तसंच, आपण वर्षानुवर्षं ऐकत आलेल्या गाण्यांकडेही नव्या नजरेने पाहायला लावतं.
‘सुखी जगण्याचा क्रॅश कोर्स’ या मालिकेतील या दुसर्या पुस्तकात सिनेगीतं खर्या अर्थाने आपल्या आयुष्याचा आरसा बनतात.
हीच आहे जादू सिनेगीतांची!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Jadoo Cinegeetanchi | जादू सिनेगीतांची By Dr. Rahul Deshpande |डॉ. राहुल देशपांडे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like