Skip to product information
Jagane Sundar Ahe
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 249.00
Pages: 150
Language: Marathi

सत्य-असत्य, नीती-अनीती, प्रेम-द्वेष, सुष्ट-दुष्ट, श्रेष्ठ-कनिष्ठ या या मूल्यसंघर्षांमुळे जगणं अधिक गुंतागुंतीचं होतं. यातून मार्ग काढत जगण्याचा सुंदर आशय शोधणं हे कमालीचं अवघड असलं तरी सुखद असू शकतं, याची गोष्ट या कादंबरीत आली आहे.

साधा विचार आणि निर्भेळ वर्तणूक यांच्यातून जगणं सुंदर करणाऱ्या भगवान या नायकाची गोष्ट सांगण्यासाठी वापरलेली भाषा सुलभ आणि वाचकस्नेही झालेली आहे. कोरीव व्यक्तिचित्रणं, ओघवतं आणि रसाळ कथानक, सुंदर जगण्याची गुपितं चिमटीत पकडणारी कथासूत्रं याने नटलेली ही कलाकृती वाचकांना गुंतवून ठेवणारी आहे. दैनंदिन खडबडीत जगण्याला मूल्यांचा स्पर्श झाल्यास जगणं कोणकोणत्या अंगाने समृद्ध होऊ शकतं, याचा सारांश या कादंबरीतून समजतो.

एकूणच जीवन सुंदर आहेच; पण जगणं सुंदर आहे का? जगणं सुंदर कसं करता येईल, या प्रश्नांचा धांडोळा घेत जगणं सुंदर करणारी कलाकृती म्हणजे ही कादंबरी. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Jagane Sundar Aahe | जगणे सुंदर आहे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like