{"product_id":"jagane-sundar-ahe","title":"Jagane Sundar Aahe | जगणे सुंदर आहे","description":"\u003cp\u003eसत्य-असत्य, नीती-अनीती, प्रेम-द्वेष, सुष्ट-दुष्ट, श्रेष्ठ-कनिष्ठ या या मूल्यसंघर्षांमुळे जगणं अधिक गुंतागुंतीचं होतं. यातून मार्ग काढत जगण्याचा सुंदर आशय शोधणं हे कमालीचं अवघड असलं तरी सुखद असू शकतं, याची गोष्ट या कादंबरीत आली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसाधा विचार आणि निर्भेळ वर्तणूक यांच्यातून जगणं सुंदर करणाऱ्या भगवान या नायकाची गोष्ट सांगण्यासाठी वापरलेली भाषा सुलभ आणि वाचकस्नेही झालेली आहे. कोरीव व्यक्तिचित्रणं, ओघवतं आणि रसाळ कथानक, सुंदर जगण्याची गुपितं चिमटीत पकडणारी कथासूत्रं याने नटलेली ही कलाकृती वाचकांना गुंतवून ठेवणारी आहे. दैनंदिन खडबडीत जगण्याला मूल्यांचा स्पर्श झाल्यास जगणं कोणकोणत्या अंगाने समृद्ध होऊ शकतं, याचा सारांश या कादंबरीतून समजतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eएकूणच जीवन सुंदर आहेच; पण जगणं सुंदर आहे का? जगणं सुंदर कसं करता येईल, या प्रश्नांचा धांडोळा घेत जगणं सुंदर करणारी कलाकृती म्हणजे ही कादंबरी. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270547599443,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Cover_JagneSundarAahe_18042025_a.jpg?v=1773818292","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jagane-sundar-ahe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}