{"product_id":"jagaycha-kasa-by-rajeev-nandkar","title":"Jagaycha Kasa | जगायचं कसं By  Rajeev Nandkar |  राजीव नंदकर","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआजच्या या धावपळीच्या व सोशल मीडियाच्या भासमान जगात माणूस \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्याचं जगणं हरवून बसलाय. वाढत्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष वास्तव यांमध्ये \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमोठं अंतर तयार झाल्याने त्याचं जगणं त्यालाच दिवसेंदिवस असह्य होतंय. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमाहितीचा भडीमार आणि नाते-संबंधातील तणाव यामुळे तो वेळी-अवेळी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअस्वस्थ होतोय. स्वत:ला नक्की काय हवं हेच त्याला उमगणं आणि समजणं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबंद झालंय. त्यामुळे लख्ख अशा प्रकाशातही माणूस चाचपडतोय. याचं कारण \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eस्व-चा स्व-ला न लागलेला शोध. ‘मी’ या शब्दातून फक्त तुमचं बाह्य रूप \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रकट होतं; तर ‘स्व’ तुमच्या अंर्तबाह्य स्वरूपाचा परिचय करून देत असतो. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e‘मी’ म्हणजे तुमच्या नावाची व पदाची ओळख; तर ‘स्व’ म्हणजे तुमच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविचारांची आणि मूल्यांची ओळख. ज्यांनी ‘स्व’ जाणलं त्यांनी विश्व जाणलं. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहे समजून घ्यायचं तर हे पुस्तक वाचलचं पाहिजे. राजीव नंदकर यांनी त्यांच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eस्वानुभवातून लिहिलेले ‘जगायचं कसं’! हे पुस्तक तुम्हाला तुमच्या स्व-चा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eशोध घेऊन साधं, सोपं, सरळ, सुटसुटीत, सुकर, सुखी व समाधानी आयुष्य \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकसं जगायचं याबाबत मार्गदर्शन करतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46110004543571,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/JagayachKasanVersion_13-800x800.jpg?v=1788329752","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jagaycha-kasa-by-rajeev-nandkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}