{"product_id":"jyeshth-nagrik-aani-aajar","title":"ज्येष्ठ नागरीक आणि आजार | Jyeshth Nagrik Aani Aajar","description":"\u003cp\u003eदैनंदिन आहारात साधारणतः ४० चे वर पोषणद्रव्ये असतात. आहारतज्ञांनी या पोषणद्रव्याचे सात भागात विभाजन केले आहे. असे - कर्बोदक (कार्बोहाइड्रेट्स), प्रथिने (प्रोटिन), वसा (फॅट्स), तंतूमय (फायबर), जीवनसत्व, क्षार (मिनरल्स) आणि पाणी, राष्ट्रीय पोषण संस्था, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हैद्राबाद यांनी भारतीयांसाठी दैनंदिन आहारविषयक खालील मार्गदर्शक शिफारस केली आहे. २५० ग्रॅम तृणधान्य, १०० ग्रॅम फळे, ४०० ग्रॅम भाज्या (फळभाजी २५० ग्रॅम आणि पालेभाजी १५० ग्रॅम), ८५ ग्रॅम डाळी, मांसाहार, ३०० ग्रॅम दूध, दही, पनीर, ताक, ३५ ग्रॅम नट्स (पिस्ता, बदाम, आक्रोड, शेंगदाणा इतर बिया), २७ ग्रॅम तेल. पुस्तकात दिल्याप्रमाणे आहारातील धान्याची आपण अदलाबदली करून खाऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीची चयापचय क्रिया, उंची, शरीराचा बांधा व कामाचे स्वरूप इत्यादिनुसार आहारात बदल होऊ शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिएंटस च्या शिफारशीनुसार - ग्रामीण भागासाठी रोज २४०० कॅलरीज आहराची माणसाला गरज असते. शहरीभागासाठी रोज २१०० कॅलरीज आहाराची माणसाला गरज असते. आहारातील प्रमाण कमी\/जास्त झाल्यास शरीराचे वजन कमी \/ जास्त होत असते. साधारणतः ७७०० कॅलरीज कमी\/जास्त झाल्यास एक किलो शरीराचे वजन कमी जास्त होत असते. म्हणून ज्या पदार्थामध्ये कमी कॅलरीज असतात, त्याचे सेवन जास्त करावे. म्हणजे वजन आणि मधुमेह नियंत्रणात राहते. - श्री. ई. डी. चौधरी सेवानिवृत्त, सहायक वनसंरक्षक तथा संचालक, आय. आर. डी. एस. एस. जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281408454739,"sku":"9.78936E+12","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Jyeshta_20Nagarik_20Aani_20Aajar_20front.jpg?v=1795505315","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jyeshth-nagrik-aani-aajar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}