३ डिसेंबर २००६
"तुम्हा पाचजणांवर कट रचून, डाव साधून एका माणसाचा खून केल्याचा आणि कागदपत्रांत फेरफार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. सबब तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे." - न्यायमूर्ती जे. ए. शेख
१३ जानेवारी २०१०
"तुम्ही पूर्णपणे निर्दोष आहात." न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती श्रीहरी डावरे
खुनाच्या आरोपाखाली आधी आठ महिने तुरुंगवास, जामिनावर सुटका आणि चार वर्षांनी निर्दोष मुक्तता. कैदी नं. सी-१४८६१ ऊर्फ सुहास गोखले या धडाडीच्या पोलिस अधिकाऱ्याची ही गोष्ट.
मात्र ही निव्वळ एका खटल्याची कहाणी नाही. हा आहे संपूर्ण पोलिसी कारकिर्दीचा - त्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवांसहित- स्थितप्रज्ञतेनं घेतलेला मागोवा... आव्हानात्मक, विजिगीषू, हादरवणारा, हळहळवणारा.
आणि तरीही तुमच्या-आमच्यासाठी कमालीचा आश्वासक !
Pickup available at HO
Usually ready in 24 hours