Skip to product information
Kanjal
Sale price  Rs. 153.00 Regular price  Rs. 170.00
Pages: 98
Language: Marathi
Overview:
‘कंजाळ’ ही बहुगुणी वनस्पती असून, तिचा वापर अनेक ठिकाणी होतो. घरावरील छप्पर करताना तिचा वापर केला जातो, तर कधी तिच्या वाळलेल्या फुलांचा वापर गाद्या व उशा भरण्यासाठी केला जातो. कंजाळाप्रमाणेच या काव्यसंग्रहातील कविता या मानवी भावविश्वाचे बहुगुण दर्शवितात. कवी नंदकुमार राऊत यांनी या काव्यसंग्रहात एकूण ६५ कविता लिहिलेल्या आहेत. यातील काही कविता या अतिशय हलक्याफुलक्या आहेत, तर काही प्रबोधनात्मक असून काही विचार करायला लावणाऱ्या आहेत. विविध मानवी भाव-भावनांचे प्रदर्शन या कवितांद्वारे कवीने अतिशय प्रभावीपणे आणि सहजपणे मांडले आहे. ‘कंजाळ’ हे नाव कवीने जाणीवपूर्वक निवडले असून आपल्या लेखणीतून त्यांनी मानवी विश्व ठळकपणे मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कवीविषयी : डॉ. नंदकुमार राऊत हे मूळचे साताऱ्या जिल्ह्यातील असून, त्यांनी कृषि या विषयात पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते मंत्रालयात अवर सचिव या पदावर कार्यरत आहेत. ‘दौशाड’ हे त्यांचे आत्मचरित्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य क्षेत्रात ते विशेष सक्रिय असून, विविध साहित्यिक संमेलनांमध्ये त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले आहे. सामाजिक, मानवतावाद आणि साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना कॅलिफोर्निया रिपब्लिक विद्यापीठाकडून डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like