Skip to product information
खानदेशातील अहिराणी बोलीतील लोकसाहित्य | Khandeshatil Ahirani Bolitil Loksahitya
Sale price  Rs. 371.00 Regular price  Rs. 495.00
Pages: 270
Language: Marathi

खानदेशातील लोकसाहित्याच्या विविध प्रकारांनी मराठी मनावर गारुड केलेले दिसून येते. डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी ‘खानदेशातील अहिराणी बोलीतील लोकसाहित्य’ या ग्रंथामधून खानदेशातील या विविधांगी मौखिक परंपरांचे यथार्थ दर्शन घडविले आहे. यात अंगाई गीत, गीतकथा, लोककथा, म्हणी, उखाणे, कुटप्रश्न, वाक्प्रचार, शब्दावली आणि विपुल अशा ओवीगीतांच्या समावेश आहे. खानदेशातील ओवीगीतांनी तर जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापलेले आहे. मौखिक परंपरेतील स्त्रियांच्या या गेय आणि भावनाप्रधान रचनाप्रकाराने लिखित वाङ्मयप्रकारांनाही खूप मोठी प्रेरणा दिलेली आहे. मराठी सतांच्या, पंडितांच्या, शाहिरांच्या आणि आधुनिक कवींच्या निर्मितीक्षेत्राचा मोठा भाग ओवीने व्यापलेला आहे. ग्रांथिक ओवी हे जात्यांवरच्या ओव्यांचेच मुक्त रूप आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत गीतानिरुपणासाठी ओवीचाच स्वीकार केलेला आहे. निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांनी लोकपरांपराचा साज असलेल्या आपल्या ओवीबद्ध कवितेने मराठी कवितेच्या क्षेत्रात अमीट छाप उमटविलेली आहे. बहुतांश सर्व प्राचीन व मध्ययुगीन संतांनी आणि कवींनी ओवी हा रचनाप्रकार हाताळलेला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

खानदेशातील अहिराणी बोलीतील लोकसाहित्य | Khandeshatil Ahirani Bolitil Loksahitya

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like