श्री. लक्ष्मण प्रकाश मोहने यांचा 'खस्ता हा काव्यसंग्रह ग्रामजीवनाचे वास्तव प्रकट करणारा आहे. कवी हे स्वतः शेतीमातीत राबणारे असून कष्टकऱ्यांचे, कास्तकारांचे हलाखीचे जीणे त्यांनी जवळून अनुभवले आहे, नव्हे त्या व्यवस्थेचाच ते एक भाग आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे रोजचे जगणे, त्यांच्या जगण्याची वाताहत, व्यवस्थेच्या शोषणशृंखलेत भरडले जाणारे जीवन सारेच शब्दरुप धारण करतात. त्यामुळे ह्या शब्दांना वास्तवाची किनार तर आहेच, सोबतच सच्च्या अनुभवांचे जाज्वलही त्यात आहे. त्यामुळेच 'खस्ता' मधील कविता खडतर शब्दानुभवांद्वारे प्रखर वेदना मांडत जाते. स्फोटक कधी हळूवारही होते. शेतशिवारातील पोळलेल्या हंगामासारखीच ही कविता आहे; मात्र ह्या शब्दांना हिरवाईचा सुध्दा सोस आहे. शेतशिवाराप्रमाणेच कवीची कविता बहरुन यावी अशा मनःपूर्वक शुभेच्छा!
Pickup available at HO
Usually ready in 24 hours