{"product_id":"kiratarjuniyam","title":"किरातार्जुनीयम | Kiratarjuniyam","description":"\u003cp\u003eमहाकवी भारवीचे ‘किरातार्जुनीम्’ संस्कृत वाड्मयातील पंचमहाकाव्यापैकी हे एक महाकाव्य आहे. कवीने हे एकमेव महाकाव्य रचून कालिदासानंतरचा महाकवी म्हणून नावलौकिक प्राप्त करून अजरामर झाला आहे. राजनीती सारखा क्लिष्ट विषायावर ह्या महाकाव्याची रचना आहे. या महाकाव्यात चार पुरुषार्थ, नितीमत्ता आदि गुणांची पखरण केलेली असल्याने बहुदा पहिले तीन सर्ग हे विद्यार्थाना अभ्यासक्रमात योजिले असतात. इतकेच नव्हे तर नेट-सेट परीक्षेकरिता देखील याचा समावेश केला आहे. प्रस्तुत पहिल्या दोन सर्गात भाषणे आहेत. वास्तविक ती एकाच व्यक्तीची व विस्तृत भाषण आहे. संवाद नाही; परंतु वनेचर, द्रौपदी, भीमसेन आणि युधिष्ठिर यांच्या सविस्तर भाषणाचा कंटाळा येत नाही; तर प्रत्येकाची भाषणे ही वेगळ्या धाटणीची आणि त्यात ठासून भरलेली राजनीती विशेष सारगर्भ वाटते. याचे सर्व श्रेय कवी भारविला आहे. समर्पक शब्दरचना, भावोत्कटता. संवादातील आशयघनता, अलंकार योजना, सुभाषितवजा उक्ति, राजनीतीचे अचूक ज्ञान हे सर्व विशेष प्रभावी वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281392201811,"sku":"9.78936E+12","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Kiratarjuniyam_20front.jpg?v=1795505110","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kiratarjuniyam","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}