{"product_id":"krantiladhyache-by-vinod-s-panchabhai","title":"Krantiladhyache Mahanayak : Umaji Raje Naik | क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक By Vinod S. Panchabhaiविनोद श्रा पंचभाई","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीही आपल्या देशात अनेक सशस्त्र उठाव झाले. ब्रिटिशांची परकीय जुलमी राजवट हुसकावून लावण्यासाठी अनेक लढवय्ये मायभूमीवर धारातीर्थी पडले! अशा प्रकारच्याच सशस्त्र उठावाद्वारे इंग्रजांना जवळपास चौदा वर्षे सळो की पळो करून त्यांची झोप उडवणारा निधड्या छातीचा नरवीर या महाराष्ट्राच्या भूमीवर दिनांक ७ सप्टेंबर १७९१ रोजी जन्माला आला त्याचं नाव होतं उमाजी नाईक ! छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान आदर्श डोळ्यासमोर ठेवून मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमाजी राजेंनी आपल्या रामोशी साथीदारांच्या साह्याने सशस्त्र लढा उभारला. त्याकाळी पुण्याचे पेशवे, मोठमोठे संस्थानिक, सरदार, जहागीरदार यांनी ब्रिटिशांचं मांडलिकत्व पत्करलं होतं. कोणीही परकीय गुलामगिरीच्या विरोधात लढण्याची जिगर दाखवून उमाजींच्या पाठीशी उभे राहायला तयार नव्हते. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उमाजी राजेंनी ब्रिटिशांची सत्ता हुसकावून लावण्यासाठी एकट्याच्या हिमतीवर उभारलेल्या या सशस्त्र क्रांतिलढ्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं! “क्रांतिलढ्याचे महानायक : उमाजीराजे नाईक' या कादंबरीत लेखक विनोद श्रा. पंचभाई यांनी उमाजीराजे आणि त्यांच्या जिगरबाज साथीदारांची रोमहर्षक शौर्यगाथा खिळवून ठेवणाऱ्या अनोख्या शैलीत मांडली आहे. उमाजीराजे यांना बेसावध अवस्थेत पकडल्यानंतर पुण्याला घेऊन येणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश हा त्यानं लिहिलेल्या पुस्तकात म्हणतो..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":45138971263059,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/612sMywBqSL._SL1000__1_2145844b-b5ed-4154-86a5-e0ceeb801499.jpg?v=1780401516","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/krantiladhyache-by-vinod-s-panchabhai","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}