Skip to product information
कृषी भूगोल | Krushi Bhugol
Rs. 169.00

कृषी भूगोल ही भूगोलाची एक महत्वाची उपशाखा असून ती शेती अथवा कृषी व्यवसायावर आधारलेली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी मानव विविध उदयोग किंवा क्रिया करत असतो. उदा. शिकार करणे, कंदमुळे-फळे गोळा करणे, शेती करणे, मासेमारी करणे, खाणकाम करणे, वस्तु उत्पादन करणे इ. सर्व क्रिया कमी अधिक प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवून देतात. व उदरनिर्वाह करण्यास मदत करतात त्यांना आर्थिक क्रिया असे म्हणतात. त्यांचा अंतर्भाव आर्थिक भूगोलात होतो. ङ्गकृषी भूगोलफ या पुस्तकामध्ये एकूण पाच प्रकरणे असून कृषी भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती,प्रमुख कृषी केंद्रे, मानवी संस्कृती आणि कृषीचा प्रसार पहिल्या प्रकरणात सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसर्‍या प्रकरणात कृषी निश्चितीचे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय घटक आणि व्हॉन थ्युनेन यांचे कृषी भूमी उपयोजन प्रतिमान, भाटीया यांचा शेती उत्पादकता निर्देशांक थोडक्यात पण महत्वपूर्ण शब्दात देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय तिसर्‍या प्रकरणात शेतीचे प्रकार, पिकांचे वितरण आणि व्यापार, आधुनिक शेती प्रवाह उदा. बागायती शेती, फुलशेती, रेशीम शेती यासारख्या गोष्टींची माहिती दिली आहे. चौथ्या प्रकरणात कृषी समस्या आणि कृषी धोरण व कार्यक्रम, हरितक्रांती, सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेती यांचीही परिपूर्ण माहिती मांडली आहे. शेवटच्या पाचव्या प्रात्यक्षिक प्रकरणात सांख्यिकी आकृत्या आणि आलेख यांची माहिती दिली आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

कृषी भूगोल | Krushi Bhugol

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like