आळशीपणा हा आपल्या आयुष्यात मित्राचे रूप घेऊन येणारा एक महाभयंकर शत्रू आहे. तो एक हलक्या पावलाने येणारा मारेकरी रोग आहे. ज्या क्षणी आपली आणि त्याची भेट होते, पुढच्याच क्षणापासून तो आपली कृती करण्याची क्षमता मारून टाकायला सुरवात करतो. आपल्या नकळत, हळुवारपणे.
नुसतीच स्वप्ने पहाणारा आणि स्वप्ने पूर्णत्वास नेणारा यांत एक महत्वाचा फरक असतो तो म्हणजे स्वप्ने पूर्णत्वास नेणाऱ्याने त्यासाठी "कृती"केलेली असते. नुसतीच स्वप्ने पहाणाऱ्याने ती कधीच केलेली नसते.
आपण आळशीपणा करतोय याची तुम्हाला कधीच जाणीव होत नाही. तुम्हाला दिसतात ते त्याचे परिणाम, आळशीपणामुळे झालेले नुकसान. तुमच्या स्वप्नांचे नुकसान, तुमच्या ध्येयाचे नुकसान. हे पुस्तक म्हणजे काही नुसते वरवरचे शाब्दिक प्रवचन नाही. आळशीपणा समजून घेऊन तो कसा दूर करता येईल यासाठी उपयुक्त तंत्रे आहेत. काही हमखास उपायही आहेत. मला खात्री आहे की जर प्रत्येकाने आळशीपणावर मात केली तर जग यशस्वी माणसांनी भरलेले असेल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours