'लडाख... प्रवास अजून सुरू आहे' या पुस्तकाचं पान आणि पान अतिशय वाचनीय झालं आहे. आत्माराम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अक्षरशः मृत्युचं तांडव पाहिलं. तेही एक दोन दिवस नव्हे तर सतत पंचवीस दिवस. लाखातील एखाद्याच्याच वाट्याला येतील असे हे अनुभव आहेत.
आत्मारामने ते प्रभावीपणे कथन केले आहेत व श्री. नरेन्द्र प्रभू यांनी त्या कथनाला तितक्याच उत्कटपणे शब्दात पकडलं आहे.
आत्मारामला लडाखची अलौकीकता साद घालतांना मी पाहिली आहे, अनुभवली आहे, त्याच्या आयुष्यातल्या ऐन उमेदीच्या वर्षांमध्ये तो 'लडाखमय' होऊन गेला होता. त्याचं श्रेयस, प्रेयस सारं काही लडाख होतं.
त्या आंतरीक हुंकाराचे अनेक पडसाद या पुस्तकातून वाचकापर्यंत सहज पोचतील याची मला खात्री वाटते.
रेणू गावस्कर, ज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका
Pickup available at HO
Usually ready in 24 hours