काय शोधत आहेस गं? विषाची पुडी शोधत आहे. 'मग तू कोठे ठेवलेली होती, तुला आठवत नाही का? काय बेशरम माणूस आहे. या असल्या माणसाला नवरा म्हणावं का? काय म्हणावं? आयं मी, उलट बोलते आहे तर. तुम्ही माझ्या मरणाची वाट पाहत आहात, खरंच! सांगते मी, तुमच्या या अशा दारूच्या व्यसनापाई मी एके दिवशी माझा जीव देईल है! सांग बरं रे तुकाराम, तू दारू का पितोस ते? अरे मी व माझ्या बायकोच्या भांडणापाई दारू पितो. आता तू सांग बरं तोताराम, तू दारू का पितोस ? आरे तुक्या, माझीसुद्धा तीच बोंब आहे. काय रे तुकाराम, या सर्व बायका नवऱ्याला पतीदेव मानतात, मग नवऱ्यांशी अशा का वागतात ? अगोदर तुक्या तू मला सांग, तू देव आहे की पतीदेव आहे ? अगोदर तोताराम तू मला देव आणि पतीदेव यातील फरक काय आहे? ते सांग. आरे फरक असा आहेन, देवाची आरती, सुखकर्ता... दुःखहर्ता आणि... पतीदेवाची आरती..... असं कर्ता... तसं कर्ता... आणि, का कर्ता... म्हणून मी पितो. अगं वसुंधरा मी काय म्हणतो! काही म्हणू नका व काहीएक सांगूपण नका
Pickup available at HO
Usually ready in 24 hours