Skip to product information
लीळाचरित्रातील समाजदर्शन | Lilachritratil Samajdarshan
Sale price  Rs. 472.00 Regular price  Rs. 675.00
Pages: 392
Language: Marathi

लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य चरित्रग्रंथ. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर यांच्या आयुष्यातील एकंदर लीळा गोळा करून नागदेवाचार्यांकडून तपासून घेऊन म्हाइंभट्टांनी संशोधित-संकलित स्वरूपात सिद्ध केलेला हा प्रमाणभूत ग्रंथ. सत्यनिष्ठेच्या कसोटीमुळे विश्वसनीय ठरलेला हा ग्रंथ म्हणजे महानुभावीय वाङ्मय आणि तत्त्वज्ञान यांचा मूलाधार आहे. श्रीचक्रधर व त्यांचा महानुभाव संप्रदाय यांच्यासंबंधीची वैविध्यपूर्ण माहिती तर ‘लीळाचरित्रा’तून मिळतेच, त्याशिवाय चक्रधरांच्या पदयात्रेच्या निमित्ताने भेटणाऱ्या अनेक व्यक्ती व स्थळे यांचा परिचयही त्यातून घडतो. तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवन इत्यादींविषयीचे तपशीलदेखील या ग्रंथातून उपलब्ध होतात. या सर्वांमुळे ‘लीळाचरित्रा’ला यादवकालीन सामाजिक-सांस्कृतिक दस्तऐवजाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. हे ओळखून सुमन बेलवलकर यांनी प्रस्तुत ग्रंथात ‘लीळाचरित्रा’चा सामाजिक दृष्टिकोणातून सविस्तर व सप्रमाण अभ्यास मांडला आहे. ‘लीळाचरित्रा’चे पंथीय तसेच साहित्यिक दृष्टिकोणातून अनेक मान्यवरांनी केलेले अभ्यास आपल्याला ठाऊक आहेत. तथापि ‘लीळाचरित्रा’चा सामाजिकदृष्टीने केला गेलेला मराठीतील हा पहिला सखोल अभ्यास आहे. ‘लीळाचरित्रा’चे स्वरूप व रचनापद्धती यांपासून ‘लीळाचरित्रा’तून आढळणाऱ्या धार्मिक-सामाजिक जीवनापर्यंत आणि ‘लीळाचरित्रा’ तून प्रकटणाऱ्या इतिहास-भूगोलापासून ‘लीळाचरित्रा’च्या भाषेपर्यंत सर्व घटकांचा सामाजिक दृष्टिकोणातून बेलवलकर यांनी घेतलेला परामर्श अत्यंत व्यासंगपूर्ण आहे. ‘लीळाचरित्रा’च्या आजवरच्या अभ्यासात पडलेली ही मोलाची भर आहे. – विलास खोले

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

लीळाचरित्रातील समाजदर्शन | Lilachritratil Samajdarshan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like