{"product_id":"live-to-ride","title":"लिव्ह टू राइड | Live to ride","description":"\u003cp\u003eहौस , शिस्त आणि साहस यांनी जर हातात हात घालून एकत्र प्रवास केला तर त्यातून मिळणारा आनंद काही विरळाच … ! मंदार ठाकुरदेसाई यांच्या हौरोची गोष्ट म्हणूनच वेगळी ठरते . सुपरबाइक्सच्या आवडीला त्यांनी प्रोफेशनल बाइकिंगची जोड दिली आवड व हौस ते साहस … आणि साहस ते ध्येयपूर्ती हा त्यांचा प्रवास सुपरबाइक्स इतकाच सुपर ठरला . कमी पल्ल्यांच्या मोहिमांपासून थेट काश्मीर ते कन्याकुमारी अशा थरारक मोहिमा करत त्यांनी सुपरबाइक्सवरुन एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला . वयाच्या पंचेचाळीशीपासून सुरू केलेल्या या धाडसी मोहिमांनी त्यांना आनंद तर दिलाच पण सोबत शिस्त , नियोजन कौशल्य , समयसूचकता आणि मित्र परिवार अशा बऱ्याच काही गोष्टीही ह्या मोहिमांतून त्यांना मिळत गेल्या . हौसेला मोल नसतं आणि वयाचं बंधनही नसतं असा आत्मविश्वास देणारं पुस्तक लिव्ह टू राइड !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232525807699,"sku":"978-93-92374-33-3","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/LivetoRidecover-1.jpg?v=1795070449","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/live-to-ride","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}