Skip to product information
लोकशाही आणि शिक्षण | Lokshahi Aani Shikshan by डॉ. जनार्दन वाघमारे | Dr. Janardan Waghmare
Sale price  Rs. 144.00 Regular price  Rs. 160.00
Language: Marathi

राज्यसभेचे विद्यमान सदस्य असलेले डॉ. जनार्दन वाघमारे यांचा मूळ पिंड शिक्षणतज्ज्ञाचा आहे. पाश्चिमात्य भाषांचे अभ्यासक, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू या भूमिकेतून त्यांनी भारतातील शिक्षणपद्धतीविषयी अतिशय मूलगामी संशोधन व चिंतन केले आहे. ह्या क्षेत्रातील डॉ.

वाघमारे यांची प्रयोगशीलता, चिकित्सक अभ्यास वृत्ती व एकूणच शिक्षणक्षेत्राविषयी त्यांच्याजवळ असलेली आस्था व तळमळ यांतूनच हे पुस्तक सिद्ध झाले आहे. लोकशाही, शिक्षण आणि ज्ञानाधिष्ठित समाज हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. प्रत्येक माणूस हा ज्ञानाधिष्ठित समाजातला ज्ञानकर्मी बनायला हवा ह्या विचारधारेतूनच डॉ. वाघमारे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

शिक्षणाधिकाराचा कायदा हा लोकशाहीच्या दृढीकरणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तो ज्ञानाधिष्ठित समावेशी समाजाचा पाया ठरणार आहे. ज्ञानकेंद्रित समाजाची निर्मिती ही प्रबुद्ध अशा लोकशाहीतच शक्य आहे आणि नेमका हाच विचार ‘लोकशाही आणि शिक्षण’ या ग्रंथात अधोरेखित झाला आहे. वाचकांना तो आवडेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Lokshahi Aani Shikshan | लोकशाही आणि शिक्षण

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like